सार्वजनीक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतले; श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

सार्वजनीक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतले; श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर, (पंढरी नगरी न्यूज ) : राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे  दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने  तहसीलदार यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
  
यावेळी पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे, राहुल कुल माजी आमदार प्रशांत परिचारक,मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधिक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, अमित निमकर तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.