"स्वेरीच्या ,वतीने नितीन भोसले याचा सन्मान..
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील नितीन तानाजी भोसले यांची मुंबई येथील मंत्रालयात महसूल विभागात निवड झाल्याबद्दल गोपाळपूर येथील स्वेरीचे संस्थापक सचिव बी.पी रोंगे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला . व त्यांना पुढील कारकीर्द उज्वल होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सरकोली येथील भीमानकृष्णा सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप भोसले, मोहन भोसले, श्रीनिवास भोसले, इ.ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.