पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा....
___________________________________________________
तुळजापूर( पंढरी नगरी न्यूज ) पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात १ डिसेंबर हा दिवस जागतिक एडस दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी कुमारी सिद्धी भोसले या विद्यार्थिनीने एड्स हा रोग कसा होतो ? यावर आपले विचार व्यक्त केले. तसेच इदू हुडा मॅडम, सुषमा येलकर मॅडम, विलास राऊत सर यांनी या एड्स हा रोग होऊ नये म्हणून कोणत्या प्रकारचे काळजी घ्यावी . तसेच या रोगाची लक्षणे कोणती यावर आपले विचार व्यक्त केले.

विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाराम सिंह यांनी एच आय व्ही या संसर्गजन्य रोगामुळे या रोगाचा प्रसार कसा होतो. हा रोग होऊ नये म्हणून काय केले पाहिजे. या रोगाची लक्षणे कोणती असतात. हे सांगून चुकीने एड्स झालेल्या एचआयव्ही बाधित व्यक्तीला देखील जीवन जगण्याची उमेद मनात निर्माण करावी. तसेच या रोगावरती कोणत्याही प्रकारची रोगप्रतिबंधक औषध व लस उपलब्ध झालेली नाही. त्यासाठी सर्वांनी या रोग, साथीपासून जागरूक राहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

तसेच जागतिक आरोग्य संघटना यासाठी कोणकोणत्या उपक्रमांचे आयोजन करत आहे याविषयी ही माहिती विद्यार्थ्यांना सांगितले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एच.जी. जाधव यांनी केले.
