सोलापूर विद्यापीठाच्या पुरवणी परीक्षा लांबणीवर; विद्यार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी

सोलापूर विद्यापीठाच्या पुरवणी परीक्षा लांबणीवर; विद्यार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी

---------------------------------------------------------------------------------

सोलापूर( पंढरी नगरी न्यूज ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा परीक्षा विभाग नेहमीच परीक्षेच्या निकालावरून चर्चेत राहिले आहे. आता सत्र परीक्षा होऊन ४० दिवस झाले, तरीदेखील सर्व अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेले नाहीत.त्यामुळे पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक निश्चित दुसरीकडे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सत्र परीक्षेला सुरवात होणार आहे. परीक्षा देताना विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे.सप्टेंबरअखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुरवणी परीक्षा घेण्याचे विद्यापीठाकडून नियोजन केले जात आहे. पण, सण-उत्सवांमुळे परीक्षा नेमकी कधी घ्यायची, यावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही.

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पहिली सत्र परीक्षा होणार आहे.दरम्यान, आता प्रलंबित निकाल आणि पुरवणी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर व्हावेत म्हणून प्राध्यापकांना अध्यापनासोबतच पेपर तपासणीचे काम करावे लागत आहे. स्पेशल ड्राईव्हमुळे अध्यापनास अडचणी येत असून अभ्यासक्रम अपूर्ण राहत असल्याचे गाऱ्हाणे मांडूनही विद्यापीठ स्पेशल ड्राईव्हवर ठाम आहे.