गादेगावची सायली बागल हिची राष्ट्रीय बॉजबाँल स्पर्धेसाठी निवड

गादेगावची सायली बागल हिची राष्ट्रीय  बॉजबाँल स्पर्धेसाठी निवड

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर ( पंढरी नगरी न्यूज ) शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगावची सायली विकास  बागल हिची महाराष्ट्राच्या संघातून राष्ट्रीय सिनीयर डॉजबॉल  स्पर्धेसाठी निवड. 29 मार्च ते 4 एप्रिल 2024 पर्यंत पंजाब येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी देशभरातून विविध राज्यातील संघ आपले खेळाडू घेऊन उपस्थित राहिले आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये गादेगावची सायली बागल हिचा समावेश करण्यात आला आहे.

या यशस्वी वाटचालीसाठी तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. तिला संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे सर त्याचबरोबर कोच फिरोज पठाण सर यांनी मार्गदर्शन केले. तिच्या या निवडीमुळे शिवरत्न जुनिअर कॉलेजने विविध स्पर्धेमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. नेहमीच क्रीडा विभागांमध्ये शिवरत्नचे विद्यार्थी राष्ट्रीय व देश पातळीवर चमकताना दिसत आहेत. ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून यशाच्या उंचीपर्यंत पोहोचवण्याचं काम शिवरत्न ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक वर्ग करत असतात. या वेळी सहशिक्षक राजेंद्र भोसले, दीपक देशमुख, सोमनाथ भुईटे, नियाज मुलाणी, नागेश कांबळे, संतोष पवार,वर्षा मोरे, शितल बागल, लीना बागल, शितल मस्के, सीमा रकटे, मसरूद्दीन पटेल,अजय मोरे उपस्थित होते.