पंढरपूर तालुका दूध संघाच्या "संचालक ,पदी रामचंद्र जाधव यांची निवड..
------------------------------------------------------------------------------------
रामचंद्र जाधव यांची संचालक पदी निवड झाल्याने सिद्धेवाडीत परिचारक कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष..
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर;( दै.पंढरी नगरी न्युज) : पंढरपूर तालुका सिद्धेवाडी येथील प्रशांतराव परिचारक सहकारी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन रामचंद्र नाथा जाधव यांची पंढरपूर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या संचालक पदी निवड करण्यात आली .
सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक व यूटोपियन साखर कारखाण्याचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या तालुका दूध संघाची निवडणूक ऑक्टोबर २०२२ मध्ये बिनविरोध पार पडली होती त्यानंतर दिनांक ३० नोव्हेंबर रोजी नवीन अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यमान संचालक मंडळाच्या उपस्थितीत बैठक झाली होती त्यावेळी अध्यक्षपदासाठी बाळासाहेब माळी उपाध्यक्ष पदासाठी सुरेखा गुरव यांचेच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर अध्यक्ष ,उपाध्यक्ष व संचालक यांचा यूटोपियन चे चेअरमन उमेशराव परिचारक यांनी स्वागत तर सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन संचालक रामचंद्र जाधव म्हणाले की स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या आशीर्वादाने माझी निवड झाली असून प्रथम मी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पंढरपूर तालुका दूध संघाच्या संचालक पदी माझी निवड परिचारक परिवाराच्या वतीने केली असून सोलापूर जिल्ह्याचे नेते माजी आमदार व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक, युटोपिन साखर कारखाण्याचे चेअरमन उमेश परिचारक,युवा नेते प्रणव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून पंढरपूर तालुका दूध संघाला ग्रामीण भागातून जास्तीत जास्त दूध संकलन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रामचंद्र जाधव यांनी सांगितले.
यावेळी श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन, संचालक व कासेगाव जिल्हा परिषदेचे सदस्य व वसंतराव देशमुख,श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक हरीश दादा गायकवाड, पंढरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती पुरुषोत्तम पवार -पाटील ,तावशी येथील प्रशांतराव परिचारक नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अनिल वगरे ,चिचुंबे येथील आनंदराव क्षीरसागर ,अनवली चे माजी सरपंच सिताराम उर्फ बुवा नाना शिंदे ,विकास सोसायटीचे माजी चेअरमन भुजंगराव यादव यांनी संचालक निवडीबद्दल अभिनंदन केले.
यावेळी सिद्धेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच सारंग जाधव ,महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्थेचे -चेअरमन बाबुराव गोडसे, संतोष (पिंटू )पाटील ,ग्रामपंचायत सदस्य- बेबीनंदा गोडसे, ग्रामपंचायत सदस्य -सुरेश गोडसे आप्पा जाधव, बालाजी जाधव ,संतोष जाधव, नवनाथ गोडसे, लक्ष्मण जाधव, सोमेश्वर पाटील, दत्तात्रेय घुले ,किरण जाधव यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून निवडीबद्दल शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला.