नागरिकांनो! पंढरपूरात उद्यापासून आचार्य नारायण गुरुजी यांच्या ‘स्वानुभव योगधाम शिबिरास’ सुरुवात; अदभुत शारीरिक बदल प्रत्यक्षात अनुभवायला मिळणा
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी- नगरी न्यूज):- ध्यान, प्राणायाम व आहार या त्रिसूत्री वर आधारित असलेला प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्र, कोल्हापूर यांचा स्वानुभव योगधाम शिबिरास उद्या शनिवारी दि.30 सप्टेंबर पासून सुरुवात होत असल्याची माहिती आचार्य नारायण गुरुजी यांनी दिली.
पंढरपूर शहरातील गणेशनाथ मंगल कार्यालय के.बी.पी. कॉलेज चौक पंढरपूर येथे उद्यापासून सं 6 ते 9 या वेळेत आपल्या जीवनातील अदभूत बदल आपणांस स्वतः अनुभवायला मिळणार आहेत.
पंढरपूर तालुक्यातील हजारो नागरिकांना हे शिबीर केले असून प्रत्येक व्यक्तीला या शिबिराचा मोठा फायदा होवून शरीराची व मनाची शुद्धी करून हजारो नागरिक आनंदी जीवन जगत असल्याचे संचालक नवीन साळुंखे यांनी सांगितले.
शिबीरातून मिळणारे फायदे :-
वजन कमी करण्याचे शास्त्रशुध्द तंत्र (उंची नुसार २ ते १० किलो वजन कमी), वजन वाढविण्याचे शास्त्र (उंची नुसार वजन कमी असल्यास), शुगर, बी. पी. या पासुन मुक्ती, निरोगी शरीर व आनंदी मन १००% रोग प्रतिकार शक्ती वाढते., नैराश्य, चिंत्ता, भीती, राग, यापासुन मुक्ती, संपूर्ण शरीरी शुध्दीकरण, वात-पित्त-कफ यापासून मुक्ती, प्राणायाम ध्यान- आहार यांचे संखोल अभ्यास, मुतखडा, दमा, त्वचारोग, मणक्याचे विकार, गुडघेदुखी इ. व्याधीची मुक्ती.
मागील शिबीरार्थीचे अनुभव :-
वजन ३,५,१० किलो वजन कमी झाले पाच साधकांच्या बी.पी. शुगर गोळ्या बंद झाल्या, शरीरावरील चरबीच्या गाठ वितळून नॉर्मल झाली, ऍन्जोप्लास्टी व रक्त पातळ होण्याच्या गोळ्या बंद झाल्या,किडनी स्टोन 18 mm चा 12mm झाला, थॉयराईडच्या, कंबरदुखी, पाठदुखी, गुडग्यांचे विकार बरे झाले., महिलांची मासिक पाळीचे प्रॉब्लेम त्याच पध्दतीने गर्भाशय पिशवीचे प्रॉब्लेम बरे झालेत. असे अदभूत शारीरीक बदल मागील शिबीरार्थी साधकांचे झालेत.
उद्यापासून सुरू होणाऱ्या या शिबिरास सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्र तसेच आचार्य नारायण गुरुजी यांनी केले आहे.