पंढरपूर नगरपालिका प्रशासन सुस्त.. नागरिक मात्र त्रस्त.. प्रभाग क्रमांक 3 घाणीचे साम्राज्य ... बा विठ्ठला!!! मुख्याधिकाऱ्यांना नागरिकांची सेवा करण्यासाठी सद्बुद्धी दे

पंढरपूर नगरपालिका प्रशासन सुस्त.. नागरिक मात्र त्रस्त..   प्रभाग क्रमांक 3 घाणीचे साम्राज्य  ... बा विठ्ठला!!! मुख्याधिकाऱ्यांना नागरिकांची सेवा करण्यासाठी सद्बुद्धी दे

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर  ( पंढरी नगरी न्यूज ) मधील प्रभाग क्रमांक 3 मटन मार्केट येथील गटारावरील चेंबर कायम तुंबलेले असतात व या ठिकाणी माणसांना येण्या-जाण्यासाठी त्याच घाण पाण्यातून यावे जावे लागते संपूर्ण परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे असे असताना सुद्धा प्रशासन सुस्त जनता घाणीने त्रस्त 
वार्ड क्रमांक तीन मधील मटन मार्केटमध्ये रहिवाशांना या ड्रेनेज चा फार मोठ्या प्रमाणात त्रास होत असून त्याचबरोबर मटन खरेदीसाठी येणाऱ्या पंढरीतील सर्व नागरिकांना  या दुर्गंधीचा अथवा घाणीचा उग्र वासाचा सामना करावा लागत आहे याकडे नगरपालिकेच्या प्रशासनाने म्हणावे तसे लक्ष न दिल्याकारणाने या समस्या उद्भवत आहेत .सदरहू तक्रार जनतेने पक्षीय कार्यकर्त्यांकडे दाखल केली असता प्रशासन राजवट असल्याकारणाने आमचे काहीही चालत नाही असे पुढाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत वारंवार तक्रारी देऊन सुद्धा पंढरपूर नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष करत आहे त्यामुळे सोलापूर जिल्हा काँग्रेसओबीसी विभाग यांच्यामार्फत महिला नागरिकांना घेऊन निवेदन देण्यात आले.

चेंबरचे  तोंडे फुटलेले असल्यामुळे त्यामधून मैला मिश्रित पाणी बाहेर येते व ते पाणी सर्वत्र पसरते व त्याच पाण्यामधून सर्व नागरिकांना यावे जावे लागते शिवाय पिण्याच्या पाण्याचे नळ बाहेर असल्यामुळे त्या नळांना सुद्धा मैला मिश्रित पाणी येते याच्यामुळे सर्व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे वारंवार तेथील नागरिक लहान मुले आजारी पडतात  तिथे कोणीही लक्ष देत नाही जर लवकरात लवकर या दुर्गंधीयुक्त पाण्याचा बंदोबस्त नाही केला तर सोलापूर जिल्हा काँग्रेस याच्या विरुद्ध तीव्र आंदोलन  करण्याचा इशारा देण्यात आला व प्रभाग तीन मधील नागरिकाकडून नगरपालिकेच्या प्रशासन कार्यालयात दुर्गंधीयुक्त मैलामिश्रित पाणी मुख्याधिकारी यांच्या दालनात आणून सर्वत्र टाकल्याशिवाय राहणार नाही. असे निवेदन सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग यांच्या मार्फत देण्यात आले.

यावेळी मा.सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष समीर कोळी, मा.अल्पसंख्या क राष्ट्रवादी सरचिटणीस रशीद शेख, उबेद शेख, बाळासाहेब आसबे काँग्रेस सोशल मीडिया पंढरपूर- मंगळवेढा अध्यक्ष, शिवाजीराजे धोत्रे व सर्व महिला, नागरिक उपस्थित होते.