खेडभोसे विद्यालय खेडभोसे मध्ये शिक्षक- पालक- विद्यार्थी सहविचार सभेचे आयोजन

खेडभोसे विद्यालय खेडभोसे मध्ये शिक्षक- पालक- विद्यार्थी सहविचार सभेचे आयोजन

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील खेड भोसे येथील विद्यालयात शिक्षक ,विद्यार्थी, पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते .दि.४ ऑक्टोबर २०२३ रोजी इयत्ता ९ वी च्या वर्गाची स्वतंत्र पालक सभा आयोजित करण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी इयत्ता ९ वी चे वर्गशिक्षक चंद्रकांत लोकरे सर व प्रमुख पाहुणे म्हणून खेडभोसे गावचे शिक्षण प्रेमी,सामाजिक कार्यकर्ते, कामगार प्रतिनिधि, वि. का. से. सोसायटी चे चेअरमन बंडू पवार हे उपस्थित होते.

यावेळी छ.शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन .बंडू पवार व उपस्थित मान्यवरांनी केले.प्रतिमा पूजनानंतर वर्गशिक्षक लोकरे सर यांनी प्रथम घटक चाचणी परीक्षेच्या निकालाचे वाचन केले. विविध विषयांतील प्रगती बाबत व विद्यार्थ्यांच्या समस्येबाबत चर्चा झाली. यावेळी बंडू पवार यांनी अत्यंत महत्वाच्या काही सूचना मांडल्या, सर्व विषयात प्रगती झाली पाहिजे, ज्या विषयात मुले मागे आहेत त्या विषयाचे ज्यादा तास घ्यावेत असे मत मांडले, तर मनसे चे करकंब विभाग अध्यक्ष हेमंत पवार यांनी गणित व विज्ञान विषयाकडे विशेष लक्ष द्यावे असे आपल्या भाषणात सांगितले. या सहविचार सभेस तानाजी गवळी, बाबुराव पवार, नामदेव पवार हे पालक व इंग्रजी विषय शिक्षक आगतराव भोसले सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शभारत झांबरे सर यांनी केले व आभार विलास आदमिले सर यांनी मानले.