तुळजापूर नवोदय विद्यालयात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी..

तुळजापूर नवोदय विद्यालयात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी..

___________________________________________________

तुळजापूर ( दै. पंढरी नगरी न्यूज ) : जवाहर नवोदय विद्यालय  भारतरत्न , देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजी यांची १९ नोव्हेंबर रोजी जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाराम सिंह यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी   उपप्राचार्य श्री एस .व्ही स्वामी,  शिक्षक वृंद,विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मा. चिराग यादव या विद्यार्थ्याने इंदिरा गांधीजी कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.   प्राचार्य श्री गंगाराम सिंह यांनी इंदिरा गांधीजी यांच्या कार्याची ओळख करून देताना त्यांच्या काळात देशात शांतता, समृद्धी, एकता कशी होते हे सांगून देशाच्या विकासासाठी सर्वांनी मतभेद व मनभेद बाजूला सारून सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच विद्यालयात दिनांक १९/११/२२ ते २५/११/२२ हा कालावधी कौमी एकता सप्ताह विद्यालयात साजरा होत आहे. या सप्ताहात रांगोळी ,समूहगीत ,भेट कार्ड  वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन ही करण्यात येणार आहे . संचालन श्री एच. जी. जाधव यांनी केले.