गादेगाव ग्रामपंचायत मधील विविध विकास कामाचे आमदार प्रवीण दरेकर यांना निवेदन.

गादेगाव ग्रामपंचायत मधील विविध विकास कामाचे आमदार प्रवीण दरेकर यांना निवेदन.

________________________________________________

पंढरपूर( प्रतिनिधी) : पंढरपूर तालुक्यातील गादेगाव ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकास कामे करण्याकरता मुंबई जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार प्रवीण दरेकर यांना  ग्रामपंचायतचे उपसरपंच गणपत मोरे सर यांनी निवेदन दिले गादेगाव अंतर्गत रस्ते तयार करण्यासाठी निधीची कमतरता असल्याने रस्त्याची कामे निधी अभावी करता येत नसल्याने रस्त्याची दयनी अवस्था दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नागरिकांना रस्त्याच्या अडचणीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गावात शेजारील रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत .त्यामुळे नागरिकांना ये -जा करण्यासाठी आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यासाठी रस्ते दुरुस्त करण्याकरता निधीची उपलब्ध असणे गरजेचे आहे .गावामध्ये अनेक  सुखसुविधा स्वच्छ गाव सुंदर गाव ही योजना राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे .अशा आशयाचे निवेदन आमदार प्रवीण दरेकर यांना देण्यात आले .

यावेळी प्रवीण दरेकर यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे गादेगाव ग्रामपंचायत मधील विकास कामासाठी २५/१५मधून रस्त्याच्या कामासाठी निधी मिळवून देण्याचे आश्वासन  देण्यात आले. मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील ,पंढरपूर मंगळवेढा  विधान सभा मतदार संघाचे अध्यक्ष अनिल बागल, विनोद बागल, ग्रामपंचायतचे सदस्य इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.