मराठा आरक्षण आंदोलन काळात मुलगी झाली, दाम्पत्याने मुलीचं नाव ठेवलं- आरक्षणा

मराठा आरक्षण आंदोलन काळात मुलगी झाली, दाम्पत्याने मुलीचं नाव ठेवलं- आरक्षणा

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) राज्यात मराठा आरक्षणासाठी  आरपारची लढाई सुरु आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केल्यानंतर राज्यभरातून मराठा समाजाने त्यांना पाठिंबा दिला.आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर सरकारला 2 महिन्यांची मुदत देत जरागेंनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. पण मराठा समाजाला 2 जानेवारीपर्यंत सरसकट टिकणारे आरक्षण न दिल्यास मराठे मुंबईत धडकतील असा इशाराही त्यानी दिला आहे .

आरक्षण आंदोलन काळात मुलगी झाली. दरम्यान, नांदेड  जिल्हयातील अर्धापूर तालुक्यातील शेलगाव इथल्या आतम राजेगोरे यांचा मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग होता. जरांगे पाटलांना पाठींबा म्हणुन आतम राजेगोरे गावात उपोषणावर बसले होते. गेल्या सोमवारी 30 ऑक्टोबर रोजी त्यांचं उपोषण सुरू असताना पत्नी गायत्री हीने मुलीला जन्म दिला. मराठा आरक्षण आंदोलन काळात मुलीचा जन्म झाल्याने या दांपत्याने आपल्या मुलीचे नाव 'आरक्षणा' असं ठेवलं आहे. मराठा आरक्षणासाठी कधी नव्हे असे ऐतिहासिक आंदोलन झाले. या मराठा आरक्षण आंदोलनाची आठवण म्हणुन आपल्या मुलीचे नाव 'आरक्षणा' ठेवल्याचे आतम राजगोरे यांनी सांगितलं.