तावशीचे राजेंद्र आसबे सर डॉ .पंजाबराव देशमुख राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

तावशीचे राजेंद्र आसबे सर डॉ .पंजाबराव देशमुख राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

-------------------------------------------------------------------------------------

सोलापूर (पंढरी नगरी न्युज ) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून डॉ .पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील शिक्षक कृती समितीचे नेते राजेंद्र असणे यांना नुकताच महाराष्ट्र राज्य कृती शिक्षक समितीचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या शुभहस्ते गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

या पुरस्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातील १७ गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .पुरस्काराचे वितरण सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात करण्यात आले.

व्यासपीठावर  संघटनेचे प्रदेश सचिव सुनील चव्हाण डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विनोद आगलावे, गुरुनाथ वांगीकर, भिमराया कापसे, सचिन चौधरी , सोमेश्वर याबाजी, आप्पासाहेब पाटील, विशाल काळे, समीर शेख, समाधान घाडगे इत्यादी प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील उपक्रमशील शाळा म्हणून करमाळ्यातील नाम साधना प्राथमिक विद्यामंदिर नगरसेवक सेंट्रल स्कूल मुले- एक व श्री .चतुराबाई श्रविका विद्यालय प्राथमिक शाळा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील  शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल नारकर यांनी तर आभार दीपक डांगे यांनी मानले.