पंढरपूर तालुक्यातील वाळु चोरांचा दिवाळीत डब्बल धमाका सुरू

पंढरपूर तालुक्यातील वाळु चोरांचा दिवाळीत डब्बल धमाका सुरू

________________________________________________

             पोलीस व महसुल प्रशासनाचे होत आहे दुर्लक्ष
________________________________________________

पंढरपूर; प्रतिनिधी : राज्याचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर तालुक्यातील चंद्रभागा नदीपाञातुन गेल्या अनेक वर्षांपासून राञीच्यावेळी वाळु उपसा होत होता परंतु सध्या या ठिकाणी वाळु चोरांना कोणाचेही भय राहिले नसल्याचे दिसून येत आहे याचे कारण म्हणजे तालुक्यातील अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या खूलेआमपणे पर्यावरणाचे नियम ढाब्यावर ठेऊन अवैद्य रित्या बेसुमारपणे वाळु चोरी चालू आहे राज्याचे महसूलमंञी राधाकृष्ण विखे-पाटील हे पंढरपूर येथे आले असता त्यांनी येथिल वाळुचोरीवरून महसूल विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते व ज्या भागामध्ये वाळु चोरी सूरू असल्याचे निदर्शनास येईल तेथिल संबधित महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यासांसह अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता.

परंतु त्यानंतरही वाळू चोरी सुरू असुन यावर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी तथा राज्य महसूलमंञी विखे-पाटील काय पाऊल उचलतात हे पहावे लागेल तर शहर, ग्रामीण, तालुका आणि करकंब या एका पंढरपूर तालुक्यासाठी चार पोलीस स्टेशन असतानाही त्या पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनेक गावांमध्ये वाळु चोरी होत असल्याचे दिसून येत आहे. आणि विषेश म्हणजे जे नागरीकांना दिसते समजते ते महसूल व पोलीस कर्मचारी अधिकारी यांना का दिसत व समजत नसावे असा प्रश्न नागरीकांमधून उपस्थित होत आहे.

तर चार दिवसांपूर्वीच सोलापूर ग्रामीणला नूतन पोलीस अधिक्षक यांची नियुक्ती झाली असून ते याबाबत काय कडक पावले उचलतात हे पहाणे अता गरजेचे बनले आहे तर नूतन सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक हे पंढरपूर तालुक्यातील अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या चालू असलेल्या वाळुचोरीवर कडक कारवाईचा जो पर्यंत बडगा उगारत नाहीत तो पर्यंत येथिल वाळु चोरांचा दिवाळीतील डब्बल धमाका सुरूच राहणार आहे.