मंगळवेढ्यात चोरट्यांचा धुमाकूळ,एकाच रात्री चार घरे फोडली ◼️अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल....

मंगळवेढ्यात चोरट्यांचा धुमाकूळ,एकाच रात्री चार घरे फोडली  ◼️अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल....


---------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज) :-
 बालाजीनगर येथे घराला कुलूप लावून नातेवाईकाच्या घरी झोपण्यास गेल्याची संधी साधून चोरट्याने घराचे कडी,कुलूप तोडून 1 लाख 97 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी एकनाथ राठोड (रा. बालाजीनगर) यांचा भाऊ श्रीकांत हा त्यांची ड्यूटी असल्याने ते सोलापूरला गेले होते. दि.11 ऑगस्ट रोजी भावाची पत्नी अंजना हि घरी कोणी नसल्याने ती व तिची मुलगी शैलजा ह्या दोघी मिळून रात्री दहा वाजता फिर्यादीच्या घरी घराला कुलूप लावून मुक्कामास आल्या होत्या. दि.12 रोजी सकाळी फिर्यादीची आई शारदा ही चालणे करिता गेली असता तिला श्रीकांतच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने जवळ जावून पाहिले असता घराचे कुलूप तोडलेले दिसले. यावेळी चोरट्यांनी कपाटाच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 97 हजार मुद्देमाल चोरुन नेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान फिर्यादीच्या गावाजवळ असलेले नंदूर येथील रेवाप्पा बिराजदार यांचे तसेच विशाल माने (रा.कागष्ट) या दोघांच्याही घरात चोरी झाल्याचे फिर्यादीला समजले. दरम्यान पोलीस करीत आहेत.