जवाहर नवोदय विद्यालयात नवोदय जनक : भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती साजरी
___________________________________________________
तुळजापूर (पंढरी नगरी न्यूज ) जवाहर नवोदय विद्यालयात २० ऑगस्ट २०२३ ( रविवार) हा दिवस स्वर्गीय पंतप्रधान ,देशाचे भूतपूर्व प्रधानमंत्री तसेच आधुनिक भारताचे निर्माते राजीव गांधीजी यांचा जन्मदिन सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात आला. या सद्भावना दिनाचे औचित्य साधून 6 विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री एस. एच. गायकवाड यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले .याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी कु. तनिष्का मगर व साईश शिंदे या विद्यार्थ्यांनी राजीव गांधीच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री एस.एच.गायकवाड यांनी ग्रामीण भागातील प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी यांनी नवोदय विद्यालयाची स्थापना कशा प्रकारे केली हे सांगत असतानाच हे नवोदयमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी सर्वोच्च पदावरती कशा पद्धतीने कार्य करीत आहेत हे सांगून राजीव गांधीने संगणक प्रणालीचा पुरस्कार करण्याचे अवाहान केले होते . सध्या या संगणक प्रणालीचा भारताच्या विकासामध्ये कसा हातभार लागत आहे. यावरती आपले विचार व्यक्त करून राजीव गांधींचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरी जाधव सर यांनी केले.