राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित रहा :- संभाजी ब्रिगेड संघटना
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) शुक्रवार दिनांक 12 रोजी पंढरपूर येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या ४२६ व्या जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. तरी आपण सहकुटुंब राष्ट्रमाता जिजाऊस अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड जयंती उत्सव सोहळा यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे .
पंढरपूर शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवमती सारिकाताई शिंदे, यांच्या शुभहस्ते राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे तसेच कार्यक्रमास शिवमती ॲड सुकेशनी शिर्के बागल, शिवमती अनिताताई पवार, शिवमती सुमनताई पवार यांच्या प्रमुख उपस्थित हा भव्य दिव्य असा हा कार्यक्रम होणार आहे .
कार्यक्रमाचे ठिकाण राष्ट्रमाता जिजाऊ स्मारक,छ.शिवाजी महाराज चौक,पंढरपूर येथे वेळ:- सकाळी ९:३० वाजता होणार आहे.तरी पंढरपूर शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी
जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड ,जिजाऊ ब्रिगेड जयंती उत्सव सोहळा समितीच्या वतीने करण्यात येत आहे.