जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेपतगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा सत्कार...
------------------------------------------------------------------------------------
पढरपूर (पंढरी नगरी न्युज) दि. 25 पंढरपूर तालुक्यातील नेपतगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थी डॉ. प्रा. सूर्यकांत परकाळे हे चांगु काना महाविद्यालय पनवेल येथे कार्यरत असून नुकतीच त्यांनी विद्रोही साहित्य: भारतीय दलित आणि आफ्रिकन अमेरिकन लेखकांचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर इंग्रजी विषयात पीएचडी संपादन करून शाळेचे व गावाचे नावलौकिक केले. तसेच दत्तात्रय खडतरे गुरुजी यांना नुकताच जुनी पेन्शन संघटनेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला बद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मायाप्पा हेगडकर यांच्या हस्ते परकाळे सरांचा सत्कार करण्यात आला तर दत्तात्रय खडतरे गुरुजी यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य भास्कर हेगडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
डॉ. प्रा. सूर्यकांत परकाळे यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या आई-वडिलांचे ऋण फेडण्यासाठी तुम्ही चांगले शिकला पाहिजे अशा प्रकारचे मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपतगाव ही खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडवण्याचे संस्कारक्षम केंद्र असल्याचे नमूद करून त्यांनी सर्व शिक्षक व शिक्षण प्रेमी गावकऱ्यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना प्रयत्नांमध्ये सातत्य व आव्हानांना धाडसानी सामोरे सल्ला दिला व देश उभारणीमध्ये योगदान देणे देण्याचे सांगितले. खडतरे गुरुजीनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की या शाळेमध्ये आम्ही घडलो. आज आम्हाला बालपण आठवलं. भविष्यात समोरील विद्यार्थ्यांचे सत्कार या ठिकाणी होतील अशा प्रकारचा अभ्यास आपण विद्यार्थ्यांनी करावा. कार्यक्रमास प्रभारी मुख्याध्यापक आनंद भोपळे उपशिक्षक विनोद जाधव कैलास बाबर शोभा घोडके चेतना जाधव इत्यादी शिक्षक व गावातील परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.