बार्शीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशनला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने सन्मानित..

बार्शीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशनला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने सन्मानित..

-----------------------------------------------------------------------------------

श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी या महाविद्यालयास  २५ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून बार्शी तहसीलदार कार्यालयाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार २०२४ तहसीलदार  एफ .आर शेख यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एस .एस गोरे, नायब तहसीलदार  संजीवन मुंढे,  रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ .एम. एस डिसले व तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य व सोलापूर जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या वतीने नवमतदार नोंदणी व मतदार जाणीव जागृती कार्यक्रम  सन २०२३ मध्ये घेण्यात आला. यात तहसील कार्यालय बार्शी व कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जाणीव जागृती अभियान राबविण्यात आले.   यात नव मतदार नोंदणी अभियान व मतदार जाणीव जागृती उपक्रम घेण्यात आले.महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये मताधिकार,लोकशाही यासंबंधी केलेली जागृती, राबविण्यात आलेले उपक्रम,नव मतदार नोंदणी करण्यात आली. याबद्दल महाविद्यालयाचा उत्कृष्ठ महाविद्यालय पुरस्कार २०२४ म्हणून गौरव करण्यात आला. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ बी .वाय यादव, उपाध्यक्ष एन. एन जगदाळे, जनरल सेक्रेटरी  पी .टी पाटील, सह सचिव , ए .पी देबडवार, खजिनदार  जे .सी शितोळे, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य व विश्वस्त यांनी अभिनंदन केले आहे.

सालाबादप्रमाणे यावर्षी देखील राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय मतदार दिवस प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी बी. एड. प्रशिक्षणार्थी व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.