भाळवणी ग्रामपंचायत कल्याणराव काळे गटाकडे सरपंचपदी - रणजितसिंह जाधव

भाळवणी ग्रामपंचायत कल्याणराव काळे गटाकडे सरपंचपदी - रणजितसिंह जाधव

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) भाळवणी ता.पंढरपूर ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदी कल्याणराव काळे गटाचे रणजितसिंह जाधव यांची बहुमताने मताने निवड करण्यात आली. सरपंचपदी जाधव याची निवड झालेनंतर येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील स्व.वसंतदादा काळे च्या पुतळ्यास नतमस्तक होऊन आशिर्वाद घेतला. यावेळी चेअरमन कल्याणराव काळे  यांनी सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या .

यावेळी संचालक सुनिल पाटील,माजी सरपंच राजकुमार पाटील, शिवसेना शिदे गटाचे तालुकाप्रमुख शिवाजी बाबर , देवडे येथील कल्याणराव काळे यांचे शिलेदार नारायण शिंदे ,संचालक मोहन नागटिळक ,पळशीचे माजी सरपंच अर्जून जाधव ,निहाल शेख, सचिन भोसले,हरि सराटे, नितीन शिंदे व यावेळी परिचारक, काळे व तिसऱ्या आघाडीचे सर्व नेते, मार्गदर्शक, युवा कार्यकर्ते  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.