ग्रंथपालन वर्ग सोलापूर केंद्राचा निकाल जाहीर...
---------------------------------------------------------------------------------
सोलापूर(प्रतिनिधी ) मा.ग्रंथालय संचालक मुंबई ,सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, सोलापूर संचलित ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा 2023 केंद्र सोलापूर च्या केंद्राचा जून 2023 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल 58.82% लागला असून सोलापूर केंद्रात सौ आदमाने श्रद्धा व कुमारी शितल पंडित या 499 गुण मिळवून केंद्रात प्रथम आल्या.तर 491 गुण मिळवून कुमारी रणदिवे रूपाली या द्वितीय व 489 गुण मिळवून सौ. डंगे अश्विनी या त्रितीय आल्या. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गुणपत्रकाचे वितरण करण्याचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी बारा वाजता सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या अशोक चौक येथील कार्यालयात पार पडला.
यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी मा.संतोष जाधव, वर्ग व्यवस्थापक प्रकाश शिंदे ,जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष ग्रंथमित्र जयंत आराध्ये मार्गदर्शक ग्रंथ मित्र कुंडलिक मोरे हे उपस्थित होते . सद्गुरु प्रभाकर महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल स्वर्गीय संगीता जयंत आराध्ये यांच्या स्मरणार्थ प्रमाणपत्र, रोख रक्कम व गुणपत्रक यावेळी प्रथम विद्यार्थ्यांना देण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र विजयकुमार पवार, कार्यवाह साहेबराव शिंदे, वर्गव्यवस्थापक प्रकाश शिंदे, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे ,सर्व संचालक मंडळ वर्गाचे मुख्याध्यापक अविनाश गायकवाड, गणेश फंड, दत्ता मोरे ,भागवत सर , रुशाली हजारे या सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.
पुणे विभागातून फक्त सोलापुरातून हा कोर्स चालला असून कोरोना काळात सुद्धा सदर कोर्स चे आयोजन जिल्हा ग्रंथालय संघामार्फत केले होते असे मनोगत जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी ग्रंथमित्र कुंडलिक मोरे ,ग्रंथमित्र जयंत आराध्ये यांनीही आपले मनोगत व्यक्त केले .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिपिक वृषाली हजारे यांनी केले तर वर्ग व्यवस्थापक प्रकाश शिंदे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. चालू वर्षी फेब्रुवारी 2024 नवीन वर्गासाठी प्रवेश सुरू केले जातील.