मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त पंढरपुरात स्वच्छता मोहीम
_________________________________________________
पंढरपूर प्रतिनिधी:- पंढरपूर येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त पंढरपुरात स्वच्छता अभियान राबवून त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त पंढरपूर शहरांमध्ये निघालेल्या मिरवणुकी दरम्यान ठीक ठिकाणी खाऊ वाटपाचे स्टॉल उभारण्यात आले. खाऊ वाटपा नंतर कागद कचरा रस्त्यावर पडतो आणि तो पडलेला कचरा स्वच्छ करण्याचं काम या मिरवणुकीच्या मागे चालत असलेले मुस्लिम बांधव करत असल्याचं दिसून आले.
हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीत पंढरपूर शहरातील तरुण मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वांनीच हातामध्ये झाडू घेत प्रदक्षिणा मार्गसह शहरातील रस्ते स्वच्छ झाडून आपले कर्तव्य पार पाडले आणि एक चांगला संदेश दिला आहे.
शहरातील रस्त्यावरील कचरा, घाण, कागद पालापाचोळा साफ करत स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर असा संदेश देत हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती साजरी केली. संत हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचे आचरण करत पंढरपुरातील मुस्लिम बांधवांनी झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचे स्वर्ग याप्रमाणे पंढरपूर शहरातील रस्ते स्वच्छ करत आपली सामाजिक बांधिलकी जपली त्याच बरोबरच आपले जे अध्य कर्तव्य आहे ते कर्तव्य देखील पार पाडले आहे त्यामुळे मुस्लिम बांधवांनी केलेल्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.