खेडभोसे येथील दोघे लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार, मराठा आरक्षण प्रकरण

खेडभोसे येथील दोघे लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार, मराठा आरक्षण प्रकरण

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार माढा लोकसभा मतदार संघासाठी खेडभोसे (ता. पंढरपूर) येथील दोन उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. 

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे- पाटील यांनी केली आहे. या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातून दोन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करावेत असे आवाहन श्री. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे. त्यांच्या या आवाहनानुसार खेडभोसे येथील मराठा समाजाने गावातील दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. 

यावेळी लोकसभेचे उमेदवार म्हणून विकास हनुमंत पवार आणि समाधान पवार या दोन उमेदवारांची नावे सर्वानुमते जाहीर करण्यात आली आहेत. उर्वरित दोन उमेदवारांची नावेही लवकरच सर्वानुमते जाहीर करण्यात येणार आहेत.