विस्तार अधिकारी डी. ए. साळुंखे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान

विस्तार अधिकारी डी. ए. साळुंखे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) मंगळवेढा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी. ए. साळुंखे यांनी 34 वर्षात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सत्कार ह.भ.प बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या हस्ते करण्यात आला.

पंढरपूर येथे आयोजित या कार्यक्रमासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची चेअरमन अभिजीत पाटील, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, मंगळवेढा पंचायत समितीचे सेवानिवृत्त गटविकास अधिकारी शिवाजी पाटील, आर. आर. जाधव, पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र पाटील, इंदिरा कन्या प्रशाला, मोहोळचे प्राचार्य आणि सचिव सुधीर गायकवाड, माजी प्राचार्य दादासाहेब साळुंखे उपस्थित होते.

यावेळी बोलताना हभप देहूकर महाराज म्हणाले की, आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहून काम केले की सर्वसामान्य जनता डोक्यावर घेतल्या शिवाय राहत नाही. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी जनते मधील दुवा बनून काम करणे आवश्यक आहे.  यावेळी चेअरमन अभिजीत पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हभप अरुण भुजबळ यांनी केले. 

यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक वासुदेव पवार, नागनाथ माध्यमिक विद्यालय, वडवळचे मुख्याध्यापक संतोष गायकवाड, सौ. अनुष्का गायकवाड, महादेव साळुंखे,  अण्णासाहेब पाटील (अजोती), अशोक चव्हाण, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद भुजबळ, नारायण ढवळे, सतीश चव्हाण, जी. बी. नरसाळे, शहाजी साळुंखे, खेडभाळवणीचे उपसरपंच अविनाश साळुंखे यांच्यासह पंढरपूर आणि मंगळवेढा पंचायत समितीमधील अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश गाजरे यांनी केले. आभार श्रावण घाडगे यांनी मानले.