सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने यशदा अभ्यासिकेची विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सोलापूर (पंढरी नगरी न्यूज ) सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, सोलापूर संचलित यशदा_अभ्यासिकाची विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
कार्यक्रमास सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष तथा ग्रंथमित्र विजयकुमार पवार, उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, संचालक धोंडीबा बंडगर , संचालिका सौ.सारिका मोरे, प्रा.सचिन पवार- पाटील, प्राचार्य सुधाकर कदम, छाया मोरे, शैलजा पवार, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राम गायकवाड, हरिभाऊ नरखेडकर, दिपाली नरखेडकर ,जय पवार इ. पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.