श्री.संत दामाजी साखर कारखान्याची गुढी पाडव्याची सभासद साखर रु २०/- या सवलतीचे दराने वाटप सुरु चेअरमन ; शिवानंद पाटील
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज ) श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची सभासदांना सवलतीचे दराने विक्री केली जाणारी साखर येणाऱ्या गुढीपाडवा सणाचे निमित्ताने दि।२६/०३/२४ ते दि।२९/०३/२४ या कालावधीत सकाळी १०।०० ते सायं।५।०० या वेळेत खालील प्रमाणे ३३ केंद्रावरुन रु।२०/-किलो दराने २५ किलो साखर देण्याची व्यवस्था करणेत आली असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.
१) कारखाना साईट-उचेठाण, बठाण, मुढवी, २) मंगळवेढा नागणेवाडी आùफीस - मंगळवेढा शहर, ३) खोमनाळ नाका-खोमनाळ, फटेवाडी, अकोला, धर्मगांव, कचरेवाडी ४) ब्रम्हपूरी-ब्रम्हपूरी, मुंढेवाडी ५) माचणूर-रहाटेवाडी, तामदर्डी, माचणूर, ६)बोराळे ७)सिध्दापूर, तांडोर ८) अरळी ९) डोणज १०) नंदुर ११) मरवडे-मरवडे, येड्राव, बालाजीनगर, कागष्ट, कात्राळ, कर्जाळ, डिकसळ १२)हुलजंती- सोड्डी, शिवणगी, पौट, येळगी, हुलजंती, १३) भोसे १४) रड्डे- रड्डे, जालिहाळ, सिध्द्नकेरी, १५)नंदेश्वर-नंदेश्वर, खडकी, जुनोनी १६) हुन्नूर- मानेवाडी, रेवेवाडी, हुन्नूर १७) लोणार- लोणार, पडोळकरवाडी १८) पाटखळ-डोंगरगांव, हाजापूर, खुपसंगी, पाटखळ १९) शिरसी २०)आंधळगांव- आंधळगांव, गणेशवाडी, शेलेवाडी, गुंजेगांव २१) लक्ष्मी दहिवडी- लक्ष्मी दहिवडी, महमदाबाद शे. २२) मारापूर-मारापुर २३) मल्लेवाडी- घरनिकी, मल्लेवाडी, देगांव, ढवळस २४)सलगर बु।- सलगर बु।, सलगर खु।, आसबेवाडी, जंगलगी २५) मारोळी २६) निंबोणी- निंबोणी, खवे, जित्ती, बावची २७) तळसंगी- तळसंगी, भालेवाडी, हिवरगांव, भाळवणी २८) गोणेवाडी २९) शिरनांदगी ३०) चिक्कलगी ३१) लें।चिंचाळे ३२)लवंगी ३३) महमदाबाद (हू।) इत्यादी केंद्रावर सभासदांचे सोईनुसार साखर वाटप करण्यात येत आहे. तसेच संबंधीत केंद्रावर कारखान्याने ठरवून दिलेल्या वेळेत उचल न केलेल्या सभासदांची साखर कारखाना साईटवर सुट्टीचे दिवस सोडून दर शुक्रवारी सकाळी १०।०० ते ५।०० या वेळेत डिसेंबर, २०२४ अखेरपर्यंत वाटप केली जाणार असल्याची माहिती पुढे बोलताना त्यांनी दिली.
कारखान्याचे अपूर्ण शेअर्स, ऊस बिल ॲडव्हान्स येणे, बेणे ॲडव्हान्स येणे, बेसल डोस येणे, ऊस तोडणी वाहतूक येणे तसेच अन्य प्रकारची कारखान्याची येणेबाकी ज्या सभासदांकडे आहे अशा सभासदांची साखर शासनाच्या धोरणानुसार देता येणार नसलेची माहिती प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली.
सभासद बंधुनी कारखान्याने ठरवुन दिलेल्या साखर विक्री केंद्रावर आपले साखर कार्ड नोंद करुन वेळेत साखर घेवून जाणेविषयीचे आवाहन व्हाईस चेअरमन तानाजी खरात यांनी केले आहे.
सदर प्रसंगी संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणूकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्रकार्यकारी संचालक रमेश जायभाय उपस्थित होते.