पंढरपुरात श्री. गुरु वै. वासुदेव महाराज चवरे गुरुजी यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त कीर्तनसेवा सोहळ्याचा कार्यक्रम

पंढरपुरात श्री. गुरु वै. वासुदेव महाराज चवरे गुरुजी यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त कीर्तनसेवा सोहळ्याचा कार्यक्रम

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्युज) पंढरपूर येथील नामवंत व प्रसिद्ध कीर्तनकार श्री गुरु वै. वासुदेव( महाराज) चवरे (गुरुजी) श्री .गुरु आंबेकर उर्फ आजरेकर फड यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त थोर संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज ह. भ .प .केशव( महाराज) नामदास यांच्या कीर्तन सेवेचा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती निशिगंधा सहकारी बँकेचे संचालक तथा ह. भ .प श्री .भागवत (महाराज )चवरे यांनी दिली .

फाल्गुन कृ 10 गुरुवार दि. 4 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत कीर्तनसेवा सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाचे ठिकाण पंढरपूर येथील चवरे गुरुजी वाडा श्री. गुरु आंबेकर उर्फ आजरेकर फड गोविंदपुरा सोलापूर रोड येथे आयोजन केले आहे .तरी पंढरपूर शहर व तालुक्यातील भक्तानी या कीर्तन सेवा सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. गुरु आंबेकर उर्फ आजरेकर फडाचे मालक ह .भ. प. श्री .भागवत (महाराज )चवरे यांनी केले.