सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी वर्षा बरबडे -पाटील, व्हाईस चेअरमन पदी बसवराज सालीमठ.
------------------------------------------------------------------------------------
वर्षा बरबडे -पाटील यांच्या निवडीने पंढरपुरात जल्लोष
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज ) : सोलापूर जिल्हा महसूल कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्थेच्या नूतन चेअरमन पदी पंढरपूरच्या तलाठी वर्षा वासुदेव बरबडे पाटील तर उपाध्यक्षपदी बसवराज सालीमठ यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डी एस भवर यांनी निवडीची घोषणा केली .सोलापूर जिल्हा महसूल कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्थेची निवडणूक २०२० ते २०२३ ते २०२७-२८ ची पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती. निवडून आलेल्या संचालक मंडळाच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदासाठी गुरुवारी निवडणूक पार पडली होती सर्व संचालकांची गुप्तपणे मतदान घेण्यात आले होते .या निवडणुकीत १५ पैकी १० मते मिळवून वर्षा बरबडे- पाटील या विजयी ठरल्या तर उपाध्यक्ष पदासाठी १५ पैकी ८ मते मिळवून व्हाईस चेअरमनपदी बसवराज सालीमठ हे निवडून आले. ही निवडणूक निर्णय अधिकारी डी एस भंवर यांच्या अध्यक्षतेखाली व सह निवडणूक निर्णय अधिकारी सुहास कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडली.
यावेळी नूतन संचालक काजी सादिक खलील ,संदीप लटके ,शरद खंडागळे, जितेंद्र कदम ,सुखदेव पाटील भाईजान रियाज हमीद ,जगदेव आप्पा धनुरे, ज्ञानेश्वर बोराडे ,भीमाशंकर भरले, बाबा कांबळे, पंकज राठोड, कुमार रवी राजवाडे, सुनिता ढोणे इत्यादी उपस्थित होते. निवड झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन या महोदयांचा सत्कार करण्यात आला, यावेळी अमर पाटील ,अमरनाथ भिंगे ,शांत कुमार गायकवाड ,चंद्रकांत हेडगिरी प्रकाश दळवी ,शरद शिंदे, लक्ष्मीकांत आयगोळे, विरुपक्षप्पा सूलगुलडे इत्यादी उपस्थित होते.