धक्कादायक! समाजकंटकांकडून छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

धक्कादायक! समाजकंटकांकडून छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

-----------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्रासह देशातील शिवभक्तामध्ये तीव्र संताप दोषीवर कारवाई करण्याची जोरदार मागणी
-----------------------------------------------------------------------------------

तामिळनाडू( दै.पंढरी नगरी न्युज) : कन्याकुमारी जिल्ह्यात रविवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, कन्याकुमारी जिल्ह्यातील कुल्लीतुराईजवळील वट्टाविलाई येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांना अटक करण्याची मागणी करत नागरिक आक्रमक झाले आहेत.

पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार एसपी हरी किरण प्रसाद म्हणाले, पुतळ्याची तोडफोड झाली की नाही हे आम्हाला माहीत नाही. मूर्तीचं थोड नुकसान झाले आहे. आम्ही गुन्हा दाखल केला आहे आणि नेमकी काय घटना घडली याचा शोधण्यासाठी एक टीम तयार केली आहे.