श्री. विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रासाठी भाविकाकडून एक लाखाची देणगी.
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी श्री संत तुकाराम भवन येथे मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. या अन्नछत्रात इच्छुकांना अन्नदान करण्यासाठी अन्नछत्र सहभाग योजना असून, या योजनेअंतर्गत कै. व्यंकटराव विश्वनाथ जवादवार व कै. मुंभाबाई व्यंकटराव जवादवार यांच्या स्मरणार्थ श्री. गणपत व्यंकटराव जवादवार रा. नांदेड यांनी 1 लाख 11 हजार 111 रूपये इतकी देणगी दिली आहे.
मंदिर समितीच्या वतीने श्री. जवादवार यांचा श्रीची प्रतिमा, दैनंदिनी, दिनदर्शिका व उपरणे देऊन सहाय्यक विभाग प्रमुख श्रीमती मनीषा जायकर व श्री प्रकाश पाटील यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.
मंदिर समितीच्या अन्नछत्र सहभाग योजनेत किमान सात हजार रुपये व त्यापेक्षा जास्त रक्कम दिल्यास इच्छित दिवशी अन्नछत्रात अन्नदान करता येते.