खेडभोसे गावात विद्युत मंडळाची वीजवाहक तार तुटून दोन दुधाळ जनावरे दगावली एका महिन्यात तीन वेळा तार तुटली यावरून मंडळाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. अंदाजे २ लाखांचे नुकसान..

खेडभोसे गावात विद्युत मंडळाची वीजवाहक तार तुटून दोन दुधाळ जनावरे दगावली एका महिन्यात तीन वेळा तार तुटली यावरून मंडळाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. अंदाजे २ लाखांचे नुकसान..

---------------------------------------------------------------------------------

खेडभोसे { दै.पंढरी नगरी न्यूज }पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथे शनिवारी दि.१५ रोजी रात्री १० वाजता विद्युत मंडळाची वीज वाहक तार तुटून  दोन दुधाळ जनावरे मृत्युमुखी पडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सत्यवान विठ्ठल पवार (रा. खेडभोसे ता. पंढरपूर) यांच्या दारात बांधलेल्या एक म्हैस आणि एक जर्सी गाय यांच्या अंगावर ३३ केव्हीं वीज वाहक तार तुटून पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला.

दोन्ही दुधाळ जनावरे अकस्मारत मृत्यू झाल्याने सत्यवान पवार यांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्यवान पवार हे आपल्या छोट्याशा कुटुंबासमवेत  शेतात राहत असून त्यांना उपजीविकेसाठी कोणतेही साधन नसल्याने त्यांनी हाताला काम म्हणून जनावरे पाळून त्यावर आपला संसार चालवीत होते.

याबाबत झालेल्या घटनेची माहिती मिळताच गाव कामगार तलाठी प्रकाश भिंगारे यांनी विद्युत वितरण कंपनीची तार अंगावर पडून मयत झालेल्या जनावरांचा पंचनामा केला आहे. तो संबंधित खात्याकडे तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी दिला असल्याचे सांगितले. सत्यवान पवार यांच्या विद्युत मंडळाकडून झालेल्या पाळीव मयत जनावरांची नुकसान भरपाई तातडीने मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थातून केली जात आहे.
--------------------------------------------------------------------------------
{ खेडभोसे गावला वीजपुरवठा करणारी ३३ केव्ही लाईन ही सुमारे ४०वर्षांपूर्वी टाकण्यात आलेली होती. या लाईनवर अतिरिक्त भार असल्यामुळे आणि चाळीस वर्षे जुनी असल्यामुळे हा अपघात झाला आहे. नशीब बलवत्तर म्हणून सत्यवान पवार यांच्या घरातील इतर सदस्यांना हानी पोहोचली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

या घटनेवरून तरी महावितरण कंपनीने बोध घेऊन खेडभोसे परिसरात असलेल्या जुन्या विजवाहक तारा बदलून त्या ठिकाणी तातडीने नवीन तारा बसवाव्या, विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल न घेतल्यास त्यांच्या विरोधात ग्रामस्थांना समवेत घेऊन आक्रमकपणे आंदोलन करण्याचा इशारा  खेडभोसे सोसायटीचे चेअरमन -बंडू पवार यांनी दिला आहे.}