विधवा सुनेला सासऱ्याचा आधार ; थरथरत्या हाताने लावलं कुंकू : खा. सुप्रियाताई सुळे...

विधवा सुनेला सासऱ्याचा आधार ; थरथरत्या हाताने लावलं कुंकू : खा. सुप्रियाताई सुळे...

*****************************************************

        खासदार, सुप्रियाताई सुळे आज पंढरपूर दौऱ्यावर..

*****************************************************

पंढरपूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे नेहमीच आपल्या थेट वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. तसेच, त्या अनेक ठिकाणी भेट देतात आणि जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. नुकतंच त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंत नागदे यांच्या निवास्थानी भेट दिली.

यावेळी त्यांना वसंत नागदे यांचा अतिशय अभिनव पैलू पाहायला मिळाला. ही गोष्ट त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेयर करत वसंत नागदे यांचं कौतुक केलं आहे.

काल म्हणजेच २९ सप्टेंबरला खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच या घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये दिली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंत नागदे यांच्या मुलाचं नुकतंच निधन झालं आहे. मात्र अशा परिस्थितीतही ते आपल्या सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांनी आपल्या सुनेच्या हस्ते सुप्रिया सुळे यांचं स्वागत केलं. यावेळी सुनबाई पाहुण्यांना कुंकू लावताना बिचकत होत्या. मात्र वसंतरावांनी लगेचच आपल्या सुनेला आधार देत प्रोत्साहन दिले. दरम्यान, हा संपूर्ण प्रसंग अतिशय भावनिक आणि अंगावर शहारे आणणारा होता.