आमदार समाधान आवताडे यांची विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी निवड, मंगळवेढा मतदारसंघातील अवताडे समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण
---------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा( दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील यांच्या भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांना प्रमोशन मिळाले आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी आमदार समाधान आवताडे यांची वर्णी लागली असून प्रथमच आमदार म्हणून निवडून आलेले आमदार समाधान आवताडे यांच्यासाठी ही मोठी संधी मानली जातेय. आजपासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून विविध राजकीय घडामोडी आज घडल्या.
राष्ट्रगीतानंतर विधानसभेच्या कामकाजास सुरुवात झाली व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष तालिका अध्यक्षपदी निवड केली आहे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आमदार समाधान आवताडे यांना संधी तालिका अध्यक्ष म्हणून मिळाली.
आमदार समाधान आवताडे हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून मध्ये पोट निवडणुकीत झालेल्या निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव केला होता. आता त्यांना येथे संधी मिळाल्याने त्यांच्यासाठी ही कलाटणी देणारी घटना असेल असे म्हटले जात आहे.