जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सिद्धेवाडी येथील विद्यार्थ्यांचे अबॅकस क्लासेस पंढरपूरचे घवघवीत यश

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सिद्धेवाडी येथील विद्यार्थ्यांचे  अबॅकस क्लासेस पंढरपूरचे घवघवीत यश

-------------------------------------

पंढरपूर -(दै .पंढरी नगरी न्यूज) 25 जून 2024 रोजी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे झालेल्या प्रो ऍक्टिव्ह नॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन 2023-24 मध्ये सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर या चार जिल्ह्यातून जवळजवळ 700 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना 6 मिनिटांत 100 गणिते अचूक सोडवायची होती.

या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सिद्धेवाडी येथील आठ मुलांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी चार विद्यार्थ्यांनी विनर ट्रॉफी जिंकली, तर इतर चार विद्यार्थी बेस्ट परफॉर्मन्स ट्रॉफीचे मानकरी ठरले.

◼️ विजेत्यांची नावे:- प्राजक्ता विश्वंभर जाधव - प्रथम क्रमांक, अंजली महेश जाधव - द्वितीय क्रमांक, आरोही गणेश जाधव - तृतीय क्रमांक, शंभुराजे दीपक जाधव - चतुर्थ क्रमांक

◼️ बेस्ट परफॉर्मर्स:- यश नागेश जाधव, योगीराज गणेश, शिंदेसाई लक्ष्मण गोडसे, अन्वेष सरंग जाधव

या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम भालेकर आणि कोळी मॅडम यांनी खूप कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अनघा प्रो ऍक्टिव्ह अबॅकस संचालिका सरिता मुढे मॅडम यांना देखील बेस्ट सेंटर अवॉर्ड आणि दहा हजार रुपयांचा चेक देऊन गौरवण्यात आले.

विजयी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपले प्रयत्न आणि मेहनत निश्चितच यशस्वी ठरले असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थातून व्यक्त होत आहेत.