श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेस भाविकाकडून 77 हजार किंमतीचे चांदीचे टाळ अर्पण.
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज):- हडपसर, पुणे येथील भाविक कमलेश अशोक मगर यांनी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस 1 किलो 055 ग्रॅम वजनाच्या चांदी वस्तू (टाळ) अर्पण केले आहेत. त्याची किंमत रू.77648/- इतकी आहे.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने देणगीदार यांचा सत्कार मंदिर समितीचे विभाग प्रमुख संजय कोकीळ यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते.