ऐन आषाढी मध्ये पंढरपूर तहसील पुरवठा कार्यालयाचे भ्रष्ट कारभार पुन्हा चव्हाट्यावर.., पुरवठा निरीक्षक नाईक यांच्यावर कारवाईची टांगती तलवार,.. पुरवठा निरीक्षक नाईक यांची चौकशी चालू असताना ते पुरवठा विभागात बसून लूडबूड करीत असल्याचे दुकानदारांमध्ये चर्चा.. पुरवठा निरीक्षक नाईक वर गुन्हा दाखल करण्याची कासेगाव ग्रामस्थांची जोरदार मागणी.. तक्रार कासेगाव येथील नागरिकांची जाब जबाब इतर गावातील घेत असल्याची चर्चा..
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) खासदार प्रणिती शिंदे यांच्या पंढरपूर गावभेटीदरम्यान कासेगाव ग्रामस्थांनी पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक हे धान्य चालू करण्यासाठी तब्बल दोन हजार रुपयाची मागणी करत असलेल्या तक्रारी वरून जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी प्रत्यक्षात तपासणी करता पंढरपूर प्रांताधिकारी सचिन इथापे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, मोहोळ पुरवठा निरीक्षक व सोलापूर पुरवठा यांची चौकशी समिती वर नियुक्ती केली असता बुधवार रोजी या पथकांनी कासेगाव ह्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचे पुन्हा एकदा जाबजबाब घेण्यात आले.
ह्या वेळी ग्रामस्थांनी पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक हे तहसील कार्यालयात बसून N नंबर काढण्यासाठी पाचशे रुपये तर अन्नसुरक्षा यादीत नाव समाविष्ट करून धान्य चालू करण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये मागणी करत असल्याचे जबाब मध्ये स्पष्ट पणे उल्लेख केला असून आपण दिलेल्या जबाबदाचा सर्व नागरिकांनी फोटो व विडिओ काढून घेतले आहे,जेणेकरून पंढरपूर तहसील कार्यालयात ह्या चौकशीत कोणताही फेरबदल करता येऊ नये तसेच कोणताही राजकीय दबाव येऊ नये.यावरून चौकशी दरम्यान जाबजबाब आणि त्यावर होणारे कारवाई हे पारदर्शकपणे होणार ह्यात शंकाच नाही. यावरून पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक हे आता चांगलेच कोंडीत अडकले असून आपल्या बचाव पक्ष करण्यासाठी इतर दुकानदाराकडून ढोबळ जाब जबाब घेत असल्याचे सूत्राकडून कळते.
मात्र तक्रार ही कासेगाव ग्रामस्थांची असून इतर दुकानदारांचा जबाब यात गृहीत धरू नये,असा पळवाट काढल्यास समस्त ग्रामस्थ हे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा करणार असल्याचे कासेगाव ग्रामस्थांनी कळविले. अशा ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेने आता नक्कीच कारवाई होणार का ? याकडे पंढरपूरकर तालूका वासियांचे लक्ष वेधून आहे. या प्रकारामुळे तपासाला वेगळीच कलाटणी मिळण्याची चिन्हे चौकशीअंती दिसत आहे.

◼️पुरवठा निरीक्षक नाईक हे N नंबर काढण्यासाठी पाचशे रुपये, तर अन्न सुरक्षा यादीत धान्य चालू करण्यासाठी दोन हजार रुपयाची मागणी माझ्याकडे केलेली आहे, जयाबाबत मी जबाब दिलेला आहे.
विलास शहाजी यादव; तक्रारदार,कासेगाव पंढरपूर.}

◼️भ्रष्ट पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्यावर कठोर निलंबणाची कारवाई करत फौजदारी गुन्हा दाखल करावा जेणेकरून भविष्यात कोणत्याही पंढरपूरातील नागरिकांची अशी पिळवणूक होणार नाही.कारण प्रकार पूर्ण पंढरपूरात चालू आहे.
शिवाजीराजे शशिकांत देशमुख; तक्रारदार, ग्रामस्थ कासेगाव पंढरपूर.