श्री विठ्ठल -रुक्मिणीमातेस भाविकाकडून 1 लाख रुपयाची देणगी;
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी):- नागपूर येथील भाविक विकास वडवाले यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस 1 लाख रुपयाची देणगी दिली.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने देणगीदार यांचा सत्कार मंदिर समितीच्या सहाय्यक विभाग प्रमुख श्रीमती मनीषा जायकर यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. सदरची देणगी मंदिर समितीच्या अन्नछत्रासाठी प्राप्त झाली आहे.