पंढरपूरचे प्रांतअधिकारी सचिन इथापे ,तहसीलदार सचिन लंगुटे यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरव ** पंढरपूर शहरवासीयांकडून प्रांतधिकारी सचिन इथापे, तहसीलदार लंगुटे यांचे कौतुक ** आषाढी एकादशी यात्रा व वारकरी, पालखी सोहळ्याचे वारीत केले होते नेटके नियोजन ** कौतुक आपल्या कार्याचे या कार्यक्रमात पंढरपूर महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मानित
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळा निमित्त पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी व पालखी सोहळ्याचे नियोजन उत्कृष्ट अशा पद्धतीने यशस्वीरित्या केल्याबद्दल पंढरपूरचे प्रांतधिकारी सचिन इथापे व तहसीलदार सचिन लंगुटे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशासनाने कौतुक आपल्या कार्याचे या कार्यक्रमात सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करून गौरवण्यात आले .

यावेळी कार्यक्रमास व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे इ. प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

पंढरपूर येथील सन 2024 आषाढी यात्रा सर्व अधिकारी वर्गासाठी प्रथमच आषाढी यात्रा यशस्वीरीत्या संपन्न करण्याचा प्रसंग आला. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यापासून ते तालुकास्तरीय प्रांतधिकारी व तहसीलदार हे नवखे असूनही आषाढी यात्रा यांनी पहिल्यांदाच पार पाडली. पूर्वीपेक्षा या आषाढी वारीमध्ये अंदाजे 24 लाख वारकरी भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी आल्याचा अंदाज आहे. सदर आषाढी यात्रा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पडले बाबत सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले होते.

पंढरपूर आषाढी एकादशी सोहळा वारीमध्ये 65 एकरासारखी धरतीवर प्रांतअधिकारी सचिन इथापे व तहसीलदार सचिन लंगुटे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथे आषाढी एकादशी यात्रा सोहळा होण्या अगोदर सर्व विभागातील अधिकाऱ्यांशी पंढरपुरात वारकरी भावी भक्तांची गर्दी होऊ नये याकरिता नियोजनाबाबतीत चर्चा करण्यात आली होती त्याप्रमाणे वारकरी भाविकांना इतरत्र मुक्काम करण्यासाठी पालखी तळ, गोपाळपूर, भटुंबरे, वाखरी या ठिकाणी वारकरी भाविक भक्तांना निवासाची सोय करण्यात आली त्यामुळे 65 एकरावरील मुक्काम ठिकाणी प्रत्येक वर्षी यात्रा दरम्यान दिवशी असणारी भाविक गर्दी कमी होऊन ती इतर ठिकाणी गेल्याने भाविकांना सुख - सुविधा देण्याचे उत्कृष्ट नियोजन चांगल्या प्रकारे करण्यात आले त्यामुळे आषाढी एकादशी यात्रा सोहळा सुरळीत पार पडला होता. एकादशी दिवशी पंढरपुरात अंदाजे 24 लाख भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले होते त्यामुळे आषाढी वारी सुखरूप झाल्याची चर्चा वारकऱ्यांमधून होत होती तसेच आरोग्य बाबत जिल्हा प्रशासनाने व तालुका प्रशासनाने विविध ठिकाणी मेडिकल कॅम्प चे आयोजन केलेले होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आषाढी यात्रा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाने कौतुक आपल्या कार्याचे हा उत्साहित कार्यक्रम घेऊन पंढरपूरचे प्रांतअधिकारी सचिन इथापे पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, तहसीलदार सचिन लंगुटे, नायब तहसीलदार पंडित कोळी, कासेगावचे मंडल अधिकारी बाळासाहेब मोरे मंडल अधिकारी दिनेश भडंगे, मंडल अधिकारी राजाभाऊ वाघमारे, मंडल अधिकारी विजय शिवशरण, तलाठी प्रमोद खंडागळे, समाधान शिंदे, अमर पाटील, प्रशांत शिंदे, मुसा काजी यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.
सदर कार्यक्रमांमध्ये इतरही , पोलीस विभाग आरोग्य विभाग, पंचायत समिती विभाग, जिल्हा परिषद विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागातील अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.