सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या ७९ व्या जयंती निमित्त.. तुंगत मध्ये मोफत सर्व रोगनिदान व औषधपचार शिबिर..,

सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या ७९ व्या जयंती निमित्त.. तुंगत मध्ये मोफत सर्व रोगनिदान व औषधपचार शिबिर..,

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै .पंढरी नगरी न्यूज)सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या ७९ व्या जयंती निमित्त मोफत सर्व रोगनिदान व औषधपचार शिबिराचे आयोजन पंढरपूर तालुक्यात दि.२९/१/२०२३ ते ५/१/२०२३ या कालवधीत विभागवार पटवर्धनकुरोली, तुंगत, कासेगांव, तसेच भाळवणी कारखाना साईटवर केलेले आहे. त्या अनुषंगाने दि.  १/२/२०२३ रोजी तुंगत येथील  शिबीरात २७० रुग्ण  तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले.

सदर कार्यक्रम प्रसंगी  तुंगत ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ सौ अमृता रणदिवे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे मा.चेअरमन महादेव भाऊ देठे,भिमा साखर कारखान्याचे माजी संचालक रामहरी रणदिवे, कालिदास रणदिवे, तानाजी काका पाटील, अर्जुन जाधव,सर्व ग्रामपंचायत सदस्य, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना संचालक प्रदीप निर्मळ, दिनकर कदम, राजाराम पाटील, उपसरपंच प्रकाश रणदिवे, माजी उपसरपंच पंकज लामकाने, सदस्य अंगत रणदिवे, बत्तासराव होनसाळे, संतोष बनसोडे, आप्पा चेअरमन, पंडीत देठे, शंकर महाराज चव्हाण, अंकुश चव्हाण, सोमनाथ गोरे,संजय पाटील, उध्दव चव्हाण, नारायण गायकवाड,दिनकर डोंगरे,मोहन चौगुले,बंडू शिंदे, सज्जन भोसले,सहकार शिरोमणीचे उपशेती आधिकारी प्रतापराव थोरात, रावसाहेब पवार, आण्णासाहेब डुबल ,सद्दाम मणेरी, उपस्थित होते.

सदर शिबीरात नेत्ररोग तज्ञ डॉ.मनोज भायगुडे,डॉ.संदेश पडवळ,डॉ रेश्मा जाधव/ करंडे ,डॉ आबासाहेब रणदिवे,डॉ योगेश रणदिवे,डॉ ओजस देवकते,डॉ सीमा पाटील, वसंतदादा काळे मेडिकल फाऊडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुधिर शिनगारे,  डॉ. जयश्री शिनगारे, डॉ.अमृता म्हेत्रे,डॉ विजय मूढे यांनी रुग्णांची तपसाणी करुन आवश्यक ते औषधोपचार केले.