महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतले श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे  यांनी घेतले श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन

------------------------------------------------------------------------------------
         
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) :- राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे   दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्या शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल- रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.


                   
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रमेश काटकर तसेच  मान्यवर पदाधिकारी यांच्यासह मंदिर समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.