शरद पवार भाजपला देणार सोलापूर जिल्ह्यात सर्वात मोठा धक्का, विधानसभापूर्वी पंढरपूर मधील बडा नेता तुतारी फुकणार , या चिमण्यानो परत फिरा रे अशी साध खा .पवार जिल्ह्यातील जुन्या मंडळींना घालणार आहेत.

शरद पवार भाजपला देणार सोलापूर जिल्ह्यात सर्वात मोठा धक्का,   विधानसभापूर्वी पंढरपूर मधील बडा नेता तुतारी फुकणार ,  या चिमण्यानो परत फिरा रे अशी साध खा .पवार जिल्ह्यातील जुन्या मंडळींना घालणार आहेत.

------------------------------------------------------------------------------------

सोलापूर ( दै पंढरी नगरी न्युज) : सोलापूर जिल्ह्यात पुन्हा शरद पवार राष्ट्रवादीमय करण्यासाठी स्वतः शरद पवार मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघातील सहकारातील बडे मातब्बर म्हणून समजले जाणारे भाजप नेते प्रशांतराव परिचारक शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्वतः प्रशांतराव परिचारक हे किंवा उमेश परिचारक पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. परिचारक बंधू यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसह भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्व नेत्यांनी विविध मतदारसंघात चाचपणी सुरु केली आहे. पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार समाधान आवताडे असल्याने त्यातच 12 राज्यपाल नियुक्त सदस्य निवडणुकीच्या यादीत भाजपकडून प्रशांतराव परिचारक यांचा साधा विचार केला गेला नसल्याने परिचारक बंधू यांची नाराजी उघड झाली आहे .

विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे प्रशांतराव परिचारक किंवा उमेश परिचारक हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करणार असल्याचे बोललं जात आहे. यासाठी प्रशांतराव परिचारक हे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे. सध्या प्रशांतराव परिचारक यांच्या गटाकडून खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मंगळवेढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतला जात असल्याचे दिसत आहे त्यासाठी परिचारक समर्थक कार्यकर्ते मोठ्या हिमतीने कामाला लागले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रशांतराव परिचारक व उमेश परिचारक बंधूंनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतल्याची चर्चा असून अपक्ष लढण्याबाबत विधानसभा निवडणूक लढण्याचे विधान केले होते. पंढरपूर - मंगळवेढा विधानसभेच्या उमेदवारीवरून भाजप मध्ये वाद रंगण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशांत परिचारक यांनी अपक्ष लढण्याची जोरदार तयारी केल्यास भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.