ऑपरेशन परिवर्तनमुळे चर्चेत मात्र, भाजप आमदाराने विधानसभेत तक्रार केलेल्या तेजस्वी सातपुतेंची बदली

ऑपरेशन परिवर्तनमुळे चर्चेत मात्र, भाजप आमदाराने विधानसभेत तक्रार केलेल्या तेजस्वी सातपुतेंची बदली

________________________________________________

सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची अचानकपणे झालेली बदली सोलापूर पोलीस दलाला धक्कादायक ठरली आहे.

तीन वर्षे पूर्ण होण्याअगोदरच तेजस्वी सातपुते यांची बदली करण्यात आली आहे. तेजस्वी सातपुते यांच्या जागी नाशिक पोलीस अकॅडमी मधील शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती झाली आहे.दरम्यान, राज्यातील महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आले आहे. शिंदे फडणवीस सरकारने २० ऑक्टोबर रोजी रात्री राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे परिपत्रक जाहीर केले आहे. यामध्ये सोलापूर ग्रामीणच्या तेजस्वी सातपुते यांची देखील बदली झाल्याचे समोर आले आहे. तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर ग्रामीणमध्ये चांगले काम केले असून, त्यांनी राबवलेल्या ऑपरेशन परिवर्तनमुळे सोलापूर पोलीस दलाचा उल्लेख लोकसभेत झाला होता, परंतु भाजपा आमदारांनी खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे राज्याच्या विधानसभेत सोलापूर पोलिसांविरोधात लक्षवेधी सूचना मांडल्या होत्या. यानंतर त्या बऱ्याच चर्चेत आल्या होत्या.

ऐन दिवाळीच्या तोंडावर तेजस्वी सातपुते यांची तडकाफडकी बदली

तेजस्वी सातपुते यांनी सातारा जिल्ह्यात असताना देखील मोठ्या प्रमाणात काम केले होते. सातारा येथे दीड वर्षे ड्युटी करून कोरोना महामारीत पोलिसांसाठी अतिशय कमी वेळेत म्हणजेच ५ दिवसांत जंबो ऑक्सिजन कोविड सेंटर देखील सातपुते यांनी उभा केले होते. यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये तेजस्वी सातपुते या सोलापूर पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्या होत्या. मात्र, २ वर्षानंतरचं ऐन दिवाळीच्या तोंडावर तेजस्वी सातपुते यांची तडकाफडकी बदली झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातुन एक ते दीड कोटींचा हफ्ता जातोय असा आरोप विधानसभेत केला होता.

दरम्यान, तेजस्वी सातपुते यांच्यावर विधानसभेत गंभीर आरोप करण्यात आले होते. सोलापूर जिल्ह्यात खुलेआम पणे अवैध धंदे सुरू आहेत, असा आरोप करत जिल्ह्यातुन एक ते दीड कोटींचा हफ्ता जातोय असा आरोप केला होता. गुटखा, वाळू तस्करी, मटका आदी खुलेआम सुरू आहे, असा आरोप बार्शीचे अपक्ष व भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी मार्च २०२२ मध्ये सोलापूर पोलिसांबाबत गंभीर आरोप करत राज्याच्या विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडल्या होत्या. याबाबत विधानसभा सदस्यांनी तक्रारी केल्यातर त्यांना व त्यांच्या कुटुंबांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात आहे, अशी लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली होती. अशी देखील लक्षवेधी सूचना राऊत यांनी विधानसभेत मांडली होती.

सुळेंनी लोकसभेत विषय मांडत तेजस्वी सातपुतेचे कौतुक केले

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळें यांनी लोकसभेत विषय मांडत तेजस्वी सातपुतेचे कौतुक केले होते. शिलाई मशीन, किराणा दुकान आदीमधून या दारूभट्ट्यावर काम करणाऱ्या पुरुष व महिलांना ऑपरेशन परिवर्तनला जोडण्यात आले असल्याचं कौतुक सुळे यांनी केले होते. सातपुते यांनी दारूभट्ट्यांवर काम करणाऱ्या परिवारासाठी ऑपरेशन परिवर्तन उपक्रम राबविले असल्याचं सुळे यांनी म्हटलं होत.