नवरात्र महोत्सव: नववी माळ श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक श्री.दुर्गा देवीमाता पोशाख सह अलंकार परिधान,

नवरात्र महोत्सव: नववी  माळ  श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक श्री.दुर्गा देवीमाता पोशाख सह अलंकार परिधान,

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरवात होत आहे. या निमित्त दुपारी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे सातव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस श्री.दुर्गा देवीमाता पोशाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, बालाजी नाम, दंडपेठ्या जोड, हिऱ्यांचे कंगन, मोत्यांचा तुरा, शिरपेच लहान, शिरपेच मोठा, मत्स्य जोड, तुळशीची माळ, एक दानी, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, तोडेजोड, बदाम लॉकेट, मोहरमाळ, शाळीग्राम हार, हायकोल, लक्ष्मीहार इ.

तसेच रुक्मिणी मातेस जडवाचा मुकुट, जडवाचा हार, जडवाचे बाजूबंद जोड, खड्यांची वेणी, पाचूची गरसोळी ,चिंचपेटी पांढरी, हातसर जोड, तनमई मोठा, मासपट्टा, तुळशीची माळ एक पदरी, शिंदे हार पूर्ण पाच पदरी, जडावाचे ताणवट जोड, चंद्र, सूर्य, मोत्यांचा कंठा, बाजीराव गरसोळी, पेठेंची बिंदी, खड्यांच्या पाटल्या जोड, मोत्याचे मंगळसूत्र, मोत्याचा तुरा, मत्स्य जोड, रुळ जोड, पैंजण जोड, बाळ्या जोड, मोठी नथ, सोन्याच्या करंडा, वाक्याजोड, तोडेजोड इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

तसेच राधिका मातेस नक्षी टोप, जवेची माळ, चिंचपेटी तांबडी, मोहरांची माळ, जवमनी पदक, ठुशी नवीन व सत्यभामादेवीला चांदीचा मुकुट, जवेच्या माळा, हायकोल, पुतळ्यांची माळ, लक्ष्मी हार, इत्यादी अलंकार व प्रथा परंपरेप्रमाणे पोशाख परिधान करण्यात आलेले आहेत.          

तसेच मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख तसेच दि. 12 ऑक्टोंबर रोजी विजया दशमी दसरा, दि.13 ऑक्टोंबर रोजी शासकीय सुट्टी व दि.14 ऑक्टोंबर रोजी भागवत एकादशी असल्याने भाविकांची मोठी प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने दर्शनरांगेत कमांडोज नियुक्ती, पाणी, चहा व खिचडी वाटप, बॅरीकेटींगची व्यवस्था तसेच पुजांची संख्या कमी करून दर्शन वेळ वाढविणे व इतर अनुषंगीक पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच रिध्दी – सिध्दी गणपती मंदिरात विजया दशमी दसरा दिवशी दरवर्षीप्रमाणे सिमोल्लंघन साजरे करण्यात येत आहे. त्या ठिकाणी देखील आवश्यक त्या सोई सुविधा पुरविण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.