जिल्हा ग्रंथालय कार्यालय सोलापूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय ग्रंथोत्सव सोहळा निबंध स्पर्धेचे आयोजन
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर (पंढरी नगरी न्यूज) सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने ग्रंथोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे अधिकारी संतोष कुमार जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रिकाद्वारे दिली. अलीकडे समाजात वाचन संस्कृती रुजावी ,नागरिकांना पुस्तके खरेदी करता यावी, ग्रंथ विक्रेत्यांना आणि प्रकाशकांना एकाच ठिकाणी पुस्तक विक्री करता यावी या उद्देशाने पंढरपूर येथे फेब्रुवारी अखेर दोन दिवसाचे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे .सदर ग्रंथोत्सवात जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन ही करण्यात आले आहे.
"समाज माध्यमात वाचन संस्कृतीचे महत्त्व, या विषयावर खुले गटातून निबंध मागविण्यात येत आहेत तसेच बाल शालेय विद्यार्थी गटातून " मला आवडलेली पुस्तक, या विषयावरही निबंध मागविण्यात येत आहेत सदर निबंध दिनांक 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुका ग्रंथालय कार्यालय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर येथे स्वीकारण्यात येतील. ही निबंध स्पर्धा 300 ते 400 शब्दाच्या मर्यादित असावी असे सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे. याकरिता सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक तथा ग्रंथ मित्र कुंडलिक मोरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी जाधव यांनी केले आहे.