*श्री विठ्ठल कारखाना सभासदाच्या ऊसाला २५०० /- दर देणार :- चेअरमन अभिजीत पाटील*
______________________________________________
पंढरपूर (प्रतिनिधी):- वेणुनगर, सन २०२२-२०२३ या गळीत हंगामा करिता कारखान्याच्या कार्यक्षेत्रांमधून ३१ हजार ५३२ एकर उसाची मोठ्या प्रमाणात नोंद शेतकर्यांनी दिली असून त्यामधून १२ लाख १५ हजार मे. टन ऊस उपलब्ध होईल त्यामुळे कारखाना पूर्ण क्षमतेने चालवला जाईल सभासदांनी आपला ऊस कारखान्यास देऊन त्याचे वेळेवर गाळप केले जाईल व गळीतास येणाऱ्या उसास २५०० रुपये इतका दर दिला जाईल. अशी माहिती श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी दिली.
गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ४७ वी आधि मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात प्रथमता पंढरपूरचे आराध्य दैवत श्री विठ्ठल प्रतिमेचे कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै. औदुंबर अण्णा पाटील. व्हाईस चेअरमन कै. यशवंत भाऊ पाटील यांच्यासह सर्व माजी चेअरमन यांच्या प्रतिमेची पूजन ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की सन २०२१ -२२ मध्ये कारखान्याची आर्थिक अडचण तत्कालीन संचालक मंडळाने उसाच्या गाळपाचे नियोजन न केल्याने कारखाना बंद राहिला त्यामुळे कारखान्याबरोबर सभासदाचेही नुकसान झाल्याने सभासद अडचणीत आल्याचे त्यांनी सांगितले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत राँ. शुगर व पांढरी साखर यास मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यामुळे केंद्र शासनाकडून ५० ते ७५ लाख टन साखर निर्यात करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. परंतु १०० लाख मे.टन साखर निर्यात करण्यास केंद्र सरकारकडून मंजुरी मिळावी असा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
कारखाना कार्यस्थळावरील मोकळी जागा एमआयडीसीला देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत ठरवण्यात आला.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांना उसाचे बेणे उपलब्ध करण्यासाठी व्ही एस आय पुणे. या संस्थेकडून मार्गदर्शन घेऊन बेणे मळा तयार करण्यात येणार सभासदांना देणे कारखान्या मार्फत देणार असल्याचे सांगितले. कारखाना व परिसरात राहणाऱ्या महिलांना स्वयंरोजगार मिळण्यासाठी मिटकॉन कंपनी बरोबर करार करून श्री विठ्ठल गारमेंट ची स्थापना केली आहे. त्यामधून महिलांना ३० शिलाई मशीन उपलब्ध करून दिलेले असून या व्यवसायातून महिलांना कापड निर्मितीच्या उद्योग उभारून सहा ते अठरा हजार पर्यंत स्वयंरोजगार उपलब्ध होईल. भविष्यामध्ये १६००० महिलांना रोजगार उपलब्ध देणार असल्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक डी आर गायकवाड यांनी उपस्थित यांचे स्वागत करून सभे पुढील विषय पत्रिकेवरील विषयाचे वाचन केले. या सर्व विषयांना सभासदांनी आवाजी मताने हात वर करून मंजुरी दिली.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रेम लता रोंगे. स्वेरी कॉलेजचे सचिव बी.पी. रोंगे. यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे. संचालक संभाजी भोसले. कालिदास पाटील. दिनकर चव्हाण. सुरेश भुसे. बाळासाहेब हाके. धनंजय काळे. साहेबराव नागणे. कालिदास साळुंखे. सचिन वाघाटे भोसले. प्रवीण कोळेकर. विजय नरसाळे. सिताराम गवळी. अशोक जाधव. तुकाराम मस्के सर. विष्णू बागल. सिद्धेश्वर बंडगर. संचालिका सविता रणदिवे. दशरथ जाधव. सुरेश सावंत. धाराशिव कारखान्याचे अमोल दादा पाटील. राजाराम सावंत. बिभीषण पवार. श्रीरंग बागल. अँड रामलिंग कोष्टी. अँड नागणे. महादेव देठे. सुभाष बागल. इत्यादी सभासद अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार विठ्ठल काँलेजचे प्राचार्य श्री नागटिळक यांनी मानले.