पंढरपूर शहर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी शहरातील चार वाळू तस्कर हद्दपार.. शहर पोलीस स्टेशनचा हद्दपारचा हा पॅटर्न तालुका पोलीस स्टेशनला राबवण्याची नागरिकांची जोरदार मागणी, कारवाईचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह- पोलीस कर्मचाऱ्यांचे पंढरपूर शहरवासीयांकडून कौतुक
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर येथील भीमा नदी पात्रातील अवैद्य वाळू उत्खनन करून व्यवसाय करणाऱ्या पंढरपुरातील चार वाळू तस्करावर गुन्हे दाखल करून त्यांना हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिली .पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे गुन्हे अभिलेखावरील ०४ वाळु तस्कर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे हददपारची कारवाई मोठी कारवाई करण्यात आल्यामुळे पंढरपूर शहरातील अवैद्य वाळूची तस्करी करणाऱ्या वाळू तस्करामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पंढरपूर शहर पोलीस ठाणे हददीतील अवैधपणे वाळु व्यवसाय करणारा वाळु तस्कर टोळीतील सराईत गुन्हेगार १) ग्यानबा दिपक थोत्रे, रा. जुनी वडार गल्ली, पंढरपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर (टोळी प्रमुख), २) गणेश यलाप्पा बंदपटटे रा. सरगम चौक, जुनी वडार गल्ली, ता. पंढरपुर जिल्हा सोलापुर (टोळी सदस्य) ३) किरण माणिक धोत्रे रा. सरगम चौक, जुनी वडार गल्ली, ता. पंढरपुर जिल्हा सोलापुर (टोळी सदस्य) ४) बाळासाहेब अंकुश पवार रा. सरगम चौक, जुनी वडार गल्ली, पंढरपुर ता. पंढरपुर जिल्हा सोलापुर (टोळी सदस्य) यांचेविरूध्द वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत घोडके यांनी २ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्यामुळे वरील प्रस्तावित हददपार इसमांवर प्रस्ताव तयार करून हददपारीचे कारवाईबाबत अहवाल सादर केला होता.
डॉ. अर्जुन भोसले साो उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर उपविभाग, पंढरपुर यांनी सदर हददपार करणेच्या संदर्भातील काम चालवुन सदरबाबतचा सविस्तर अहवाल मा. पोलीस अधिक्षक, अतुल कुलकर्णी सोलापुर ग्रामीण यांचेकडे सादर केला होता त्या अनुशंगाने हददपार कामकाज चालवुन सदर टोळी प्रमुख व सदस्यांना मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी संपुर्ण सोलापूर जिल्हयातुन ५० दिवस कालावधीकरीता हददपार करण्यात आले असून हददपार इसम नामे १) ग्यानबा दिपक धोत्रे, रा. जुनी वडार गल्ली, पंढरपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर (टोळी प्रमुख), २) गणेश यलाप्पा बंदपटटे रा. सरगम चौक, जुनी वडार गल्ली, ता. पंढरपुर जिल्हा सोलापुर (टोळी सदस्य) ३) किरण माणिक धोत्रे रा. सरगम चौक, जुनी वडार गल्ली, ता. पंढरपुर जिल्हा सोलापूर (टोळी सदस्य) ४) बाळासाहेब अंकुश पवार रा. सरगम चौक, जुनी वडार गल्ली, पंढरपुर ता. पंढरपुर जिल्हा सोलापुर (टोळी सदस्य) यांना ताब्यात घेवून सदर हददपार आदेश बजावण्यात आलेला आहे. यापुढेही पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे गुन्हे अभिलेखावरील दोन पेक्षा जास्त दाखल गुन्हयातील वाळु तस्करावर हदपार करणेसंदर्भातील कामकाज सुरू आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी , अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रितमकुमार यावलकर, पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले , पंढरपूर शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके , शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष कांबळे, श्रे. पोसई राजेश गोसावी, पोलीस नाईक सचिन इंगळे, पोहवा प्रसाद औटी, पोकॉ दिगंबर भंडरवाड, पोकों अनिस शेख यांनी केली आहे.