डेंग्यू मलेरियाच्या गंभीर रुग्णावर होणार प्रभावी उपचार - डॉ. बबिता कमलापूरकर
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण संस्था महारष्ट्र राज्य यांचे वतीने व CHRI, PATH व गोदरेज या स्वंयसेवी संस्था यांच्या सहकार्याने डेंगी मलेरियाच्या गंभीर रुग्णांचे व्यवस्थापन अध्यायावत उपचार कशा पद्धतीने करावे आणि हे उपचार सरकारी रुग्णालयात कसे द्यावेत यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधून भीषक (फिजिशियन) व बालरोग तज्ञ यांची दोन दिवसाची कार्यशाळा दिनांक 3 व 4 फेब्रुवारी 2025 रोजी पुण्यात पार पडली. सदरचे प्रशिक्षण हे प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (ToT) होते. या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षित झालेल्या भीषक व बालरोग तज्ञांनी आपल्या जिल्ह्यामधील इतर खाजगी तसेच सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करून याचा फायदा गोरगरीब रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी करावा जेणे करून कीटक जन्य आजारामध्ये होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करता येईल व असे प्रतिपादन राज्याचे सहसंचालक डॉ. बबीता कमलापूरकर यांनी केले.
सदर कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून नवले मेडिकल कॉलेजचे विभागप्रमुख डॉ. दिलीप कदम, ससून रुग्णालयाचे सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. सुवर्णा जोशी तर ससून रुग्णालयाचे डॉ. नागनाथ रेडेवाड, डॉ. तेजस्विनी काळे, डॉ. छाया वळवी यांनी तसेच PCMC वैद्यकीय महाविद्यालयाचे PSM विभागाचे विभाग प्रमुख डॉ. हर्षल पांडवे, नवले रुग्णालयाचे डॉ. खालिद खतीब यांनी मार्गदर्शन केले.
तर राज्य स्तरावरून डॉ प्रेमचंद कांबळे सहाय्यक संचालक, राज्य कीटक शास्त्रज्ञ डॉक्टर महेंद्र जगताप कनिष्ठ कीटक शास्त्रज्ञ डॉ. सोमाजी अनुसे, तर याच्या आयोजनासाठी CHRI चे डॉ. अमित गंभीर डॉ. नेहा वाघ व राहुल राठोड यांनी परिश्रम घेतलेआदरणीय सहसंचालक डॉ. बबीता कमलापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नियमित कंटेनर सर्वे, आवश्यक त्या ठिकाणी दूर फवारणी आरोग्य शिक्षण देणे रक्त नमुने घेणे याची वेळेत तपासणी करणे संशय डेंगू चिकनगुनिया रुग्णांचे रक्तजन नमुने तपासणीसाठी नियम मेडिकल कॉलेज सोलापूर येथे पाठवून आलेल्या रिपोर्टनुसार विहित कार्यवाही करण्याचे कामकाज चालू आहे. त्यामुळे शहर व जिल्हा सोलापूर येथे गतवर्षीच्या तुलनेत सर्व आरोग्य कर्मचारी आशाताई यांचे मार्गदर्शन यामुळे रुग्णांची संख्या कमी आढळून आलेली आहे. असेच कामकाज याही वर्षी करण्याचे नियोजन व प्रत्यक्ष कृतीत उतरण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल यांनी दिली.