श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरास दोन लक्ष रुपयाची देणगी,
___________________________________________________
पंढरपूर (दैनिक ,पंढरी नगरी न्यूज ): - श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरे समितीस नित्या मुक्तानंद चॅरिटेबल ट्रस्ट, पाचगणी यांच्याकडून दोन लक्ष रुपयांची देणगी प्राप्त झाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

पाचगणी जिल्हा सातारा येथील सदरचा ट्रस्ट असून त्यांनी मंदिर समितीच्या विविध विकास कामास हातभार लागावा म्हणून ऑनलाइन पद्धतीने देणगी दिली आहे. ऑनलाइन पद्धतीने देणगी देण्यासाठी क्यू आर कोड, आरटीजीएस, संकेतस्थळ, मोबाईल ॲप इत्यादी माध्यमे उपलब्ध आहेत. याद्वारे देणगी देणाऱ्या भाविकांना देणगीची पावती व प्रसाद पोष्टद्वारे पाठवण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे.
याशिवाय, अनिल तुकाराम खराडे राहणार कोथरूड पुणे या भाविकाने 50 हजार रुपयाची देणगी दिली असून, त्यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कर्मचारी रमेश गोडसे यांनी श्री ची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला.
तसेच सुनील रोहकले रा. मुंबई या भाविकांने 926 ग्रॅम वजनाची चांदीची समई श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केली असून, त्याची अंदाजे किंमत 83 हजार इतकी होत आहे. त्याबद्दल त्यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कर्मचारी पृथ्वीराज पोळ यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी मंदिर कर्मचारी सुधाकर घोडके व देणगीदार यांचे कुटुंब उपस्थित होते.