पंढरपुरात दि.३ मार्च रोजी परिवर्तनवादी वारकऱ्यांचा भव्य महासमन्वय मेळाव्याचे आयोजन..
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै .पंढरी नगरी न्युज ) : पंढरपूर येथे बहुजन समाजातील परिवर्तनवादी वारकऱ्यांचा भव्य महासमन्वय मेळावा दिनांक ३ मार्च २०२३ रोजी शुक्रवारी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने दुपारी ठिक ०२ वाजता आयोजित केला आहे. खालील विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल त्यानुसार खालील प्रमाणे विषय :-
१) वारकरी भागवत धर्माची दशा व दिशा, २) मानवतेसाठी केलेली संतांची कार्ये व त्यांची फलनिष्पत्ती., ३) भारतीय लोकशाहीचा पाया रचण्यामध्ये वारकरी संतांचे योगदान., ४) अखंड हरिनाम सप्ताहाची खरी रूपरेषा., ५) कृषी सप्ताह समाज प्रबोधन काळाची गरज, ६) संगीत भागवत, संगीत रामायणापेक्षा संगीतमय संत कथा, संगीतमय शिवचरित्र तथा संगीतमय महापुरुषांच्या कथा काळाची गरज, ७) विठोबा रखुमाई मुक्ती आंदोलनाची पुढील वाटचाल, ८) वारकऱ्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत चे सर्व संस्कार,, पूजा ,विधी, लग्न सोहळे कोणी व कशी करावीत., ९) वारकरी संतांनी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला ,की अंधश्रद्धा... एक चिंतन मंथन., १०) भारतात खरी लोकशाही आणण्यासाठीच्या उपाययोजना., ११) मानवतावादी विचारांच्या वारकरी शिक्षण संस्था किंवा प्रशिक्षण केंद्रे चालू करणे,. १२) विभागीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय वारकरी संमेलने घेण्याविषयी चर्चा, ऐनवेळी येणाऱ्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, गायक, वादक, विणेकरी , चोपदार, टाळकरी , इ.कलावंत, सप्ताह आयोजन कमिटी वारकरी मंडळीने या महासमन्वय मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
मेळाव्याचे ठिकाण विश्वपुण्यधाम, श्री संत कैकाडी महाराज मठ पंढरपूर वेळ:- दुपारी ठीक ०२ वाजता या महा समन्वय मेळाव्यास विविध संघटना सहभागी होणार असून यामध्ये संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद. सकल संत परिवार सेवा संघ. सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघ. राष्ट्र जागृती वारकरी परिषद. श्रमिक मुक्ती दल.विद्रोही सांस्कृतिक चळवळ. सत्यशोधक चळवळ. अखिल भारतीय किसान सभा. गाथा परिवार महाराष्ट्र. महात्मा बसवेश्वर छत्रपती शिवाजी महाराज समिती कलकत्ता. व सर्व परीवर्तनवादी विचारांच्या शिवप्रेमी वारकरी संघटना इत्यादी सहभागी होणार आहेत.
संयोजक :- विठोबा रखुमाई मुक्ती आंदोलन, पंढरपूर संपर्क :- ह.भ.प.गंगाधर महाराज कुरुंदकर ९४२३१०२५९७ शिवश्री मोहन अनपट ९८६०९५९५६५ शिवश्री दिलीप भोसले ८२०८३१३७१९ शिवश्री किरण घाडगे ९४२२४६३००२ शिवश्री संजय पाटील ७०२०१६७२२५
टिप :- रात्री ०९ ते ११ या वेळेत एकादशी निमित्त गजर कीर्तनाचा सोहळा प्रबोधनाचा या कार्यक्रमांतर्गत समाज प्रबोधन पर किर्तन होईल सर्व मानवतावादी शिवप्रेमी वारकरी यांनी भव्य महासमन्वय मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात येत आहे.