श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका बार्शी वाचनालयात " जागतिक महिला दिन" साजरा . भगवतद्गगीता पुस्तक भेट देऊन 15 महिलांचा केला सन्मान
------------------------------------------------------------------------------------
बार्शी (दैनिक,पंढरी नगरी न्यूज न्यूज )- बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे दिनांक ०८/०३/२०२५शनिवार रोजी सांय.ठिक ६-०० वाजता "जागतिक महिला दिना" निमित्त वाचनालयाच्या महिला सभासदांना भगवद्गगीता हे पुस्तक भेट देऊन सत्कार करून "जागतिक महिला दिन" साजरा करण्यात आला आहे.

या मध्ये वाचनालयाच्या १५ महिला सभासदांचा सत्कार करण्यात आला. या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीमाळ ,संचालक धिरज कुंकूलोळ,प्रमोद भंडारी हे उपस्थित होते.वाचनालयाचे सहा.ग्रंथपाल पल्लवी तौर मॅडम यांनी प्रास्ताविक केले.व सर्व महिलांना पुस्तके भेट देऊन,त्यांचा यत्तोचित सत्कार करण्यात आला.
आभार प्रदर्शन वाचनालयाचे क्लार्क विराज पतंगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास वाचक व सभासद महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.